MNS | “राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर शिल्लक सेनेचे प्रमुख आणि छोटे नवाब…”; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

MNS | मुंबई : सध्या राज्यातील राजकीय वातावरण खूपच तापलेलं दिसून येतं आहे. अशातच बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाले मनसे (MNS) प्रवक्ते गजानन काळे

यासंदर्भात गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ऐन दिवाळीत महाविकास आघाडीमध्ये फटाके फुटू लागले आहेत. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल, असे विधान राष्ट्रवादीचे नेते करू लागले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनरही लावले आहेत. त्यामुळे शिल्लक सेनेचे प्रमुख व छोटे नवाब यांचे काय होणार? हा महाराष्ट्राचा अपमान आहे.

दरम्यान, जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्यामुळे पुढचं सरकार महाविकास आघाडीचंच सरकार असणार आहे. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच असणार आहेत, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं होतं.

तसेच, अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असं अनेक लोकांचं मत आहे. माझंसुद्धा हेच मत आहे. पण शेवटी आपल्याला आकड्यांचं समीकरण लक्षात घ्यावं लागेल. येत्या काळात मित्रपक्षांना विश्वासात घेऊन आमचे पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल. त्यानंतर बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत, त्यावर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजित पवार असं लिहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.