MNS | “विरोधी पक्षनेते काही दिवसांपासून शांत आहेत, गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून रहा रे”, मनसे नेत्याच्या ट्विटने टाकलं कोड्यात

MNS | मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आजारी असून सुद्धा शिर्डी येथे सभेसाठी उपस्थित राहिले. त्यांच्या या उपस्थितीने अनेकांचं लक्ष वेधलं. मात्र, विरोधकांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे अजित पवार यांच्या अनुपस्थितीने. विरोधी पक्षनेते तसेच राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सभेला हजर न राहिल्याने मनसे (MNS) नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.

आदरणीय पवार साहेब तब्येत ठीक नसतांना राष्ट्रवादीच्या शिबिरात येतात व अजितदादा बरोबर त्याच वेळी वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात, ही बाब काही पचनी पडत नाही.तसेही दादा विरोधी पक्षनेते म्हणून शांत आहेत काही दिवसांपासून.गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून रहा रे, कूछ तो गडबड हैं, असं गजानन काळे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पाहा ट्विट –

दरम्यान, मेळाव्यादरम्यान शरद पवार यांनी भाषण देखील केलं असल्याचं समजतं आहे. पवारांनी आजच्या सभेत फक्त पाचच मिनिटं भाषण केलं. कदाचित सभेत केवळ पाच मिनिटं भाषण करण्याची पवारांची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे. तसेच प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी अधिक संवाद साधला नाही. परंतू त्यांचं लिखित भाषण राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं.

शरद पवार हे थेट ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन शिर्डीतील पक्षाच्या मेळाव्याला आले. यावेळी त्यांनी काही नेत्यांची भाषणं ऐकली. नंतर समारोपाचं भाषण अवघ्या पाच मिनिटात उरकलं घेतलं. त्याचबरोबर आज सविस्तर बोलणं शक्य नाही. वैद्यकीय अधिकाऱ्याने 10 ते 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर मला माझं काम करता येईल. तेव्हा मी बोलेन, असं शरद पवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.