MNS | सामनाच्या ‘त्या’ जाहीरातीवर मनसेचा सवाल, म्हणाले…
MNS | मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारकांना दारेवर धरलं होतं. राज्यातील सरकार हे ५० खोके घेऊन सत्तेत आलेलं सरकार असल्याचा आरोप करत राज्य सरकारला खोके सरकार असं नाव देखील विरोधकांनी दिलं आहे. असातच याच खोके सरकारची जाहिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सामना (Saamana) वृत्तपत्रात पहिल्याच पानावर झापण्यात आली आहे. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच मनसे (MNS) पक्षाचे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी ट्विट करत टीका केली आहे.
खोके सामनामध्ये पोहोचले का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विट करून केला आहे. सामनाचं खरं स्वरुप लोकांसमोर आलं आहे. आदित्य ठाकरे रोज सांगतात हे अनधिकृत सरकार आहे. मग या अनधिकृत सरकारची अधिकृत जाहिरात सामनात कशी? सर्व तत्त्वे बाजूला करतो आणि पैसे गोळा करतो हेच या जाहिरातीतून सिद्ध होत आहे, असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
स्वातंत्र्याची 75 वर्ष… एका वर्षात 75,000 रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प. पहिल्या टप्प्यातील नियुक्ती प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम, असा या जाहिरातीवर मजकूर लिहिण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महासंकल्प कार्यक्रमाला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित करणार असल्याचा या जाहिरातीत उल्लेख आहे.
यादरम्यान, प्रमुख उपस्थितांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांची नावे आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचंही नाव आहे.
या जाहिरातीत सर्वात वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. तर जाहिरातीच्या मध्ये एकनाथ शिंदा आणि देवेंद्र फडणवीस यांचा नियुक्तीपत्रांचं वाटप करतानाचा फोटो आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Himesh Reshammiya | ‘Badass रविकुमार’ चित्रपटाचा टीजर रिलीज, हिमेश रेशमियाचे चित्रपटसृष्टीत पुनरागमन
- Uddhav Thackeray | “उद्धव ठाकरे शिवसेना वाचवण्यासाठी पंढरीच्या वारी ऐवजी हैद्राबादची वारी करतील”
- Ravi Rana । “दम दिला तर घरात घुसून…”; बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्यावर रवी राणांचा पलटवार
- Sushma Andhare | “चिमणराव, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला?”
- Bachchu Kadu | रवी राणा यांनी तलवार घेऊन यावे मी… ; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.