InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

तडीपारच्या नोटीसला मनसे नेते नितीन नांदगावकर देणार उत्तर !

मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी गेल्या महिन्यात नोटीस बजावली होती. नांदगावकर यांच्यापासून मुंबईकरांच्या जीवाला धोका असून अनेक जण भयभीत झाल्याचा ठपका ठेवला होता. आरोपांबाबत म्हणणे मांडा, अन्यथा मुंबईतून दोन वर्षांसाठी तडीपार करू, असा इशारा मुंबई पोलिसांनी नांदगावकर यांना दिला होता. पोलिसांनी बजावलेल्या या नोटीसला नांदगावकर गुरुवार ७ मार्चला उत्तर देणार आहेत.

”पोलिसांनी मला माझे म्हणणे मांडण्यास सांगितले असून मी माझ्या वकिलासह गुरुवारी पोलीस स्थानकात हजर राहणार आहे. पोलिसांना काही साक्षीदारांची गरज आहे. त्यामुळे मी जे काम करत आहे ते तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमचा पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘नितीन नांदगावकर डॉट कॉम’ या संकतेस्थळावर जाऊन तिथे जो फॉर्म देण्यात आला आहे तो भरावा. हे फॉर्म मी पोलिसांसमोर सादर करणार आहे” असे आवाहन नांदगावकर यांनी फेसबुक व्हिडीओद्वारे केले आहे .

सर्वसामान्यांना लुटणारे रिक्षाचालक असो, मराठी माणसांची फसवणूक करणारे बिल्डर असो, मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व म्हणून नितीन नांदगावकर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.