InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मनसेतर्फे नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ठाणेकरांना “सीड बॉम्ब” चे वाटप

अनेक प्रशांवर खळ्खट्याक करणाऱ्या मनसेने ठाण्यात खळबळ उडवून दिली. ठाण्यात मनसे बॉम्ब फोडणार याची जोरदार चर्चा अनेक दिवस ठाण्यात सुरु होती. तर ठाणे मनसेने याचे भांडवल आणि गाजावाजा केल्याने मनसेचा बॉम्ब नेमका कुठला? याबाबत लोकांनाही उत्सुकता बाळगली होती. ठाणेकर आणि प्रसारमाध्यमे कामाला लागली. तर मनसे बॉम्ब वाटप करणार असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्तही लावण्यात आला होता. अखेर संध्याकाळी मनसेचा बॉम्ब फुटला. अन् उत्सुकता संपली.

मनसेच्या बॉम्बची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच मनसेच्या नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ठाणेकरांना “सीड बॉम्ब” चे वाटप करण्यात आले. राज्यातील आणि देशातील दुष्काळाची परिस्थिती पाहता आता पावसाळ्याच्या दिवसात “सीड बॉम्ब” झाड लावण्यासाठी असलेले बी चे वाटप मनसे नेते अभिजित पानसे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी कोण आला रे कोण आला मनसे चा बॉम आला अशी घोषणा देखील मणसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply