InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘रस्त्यावर सभा घ्यायला परवानगी द्या’; मनसेची निवडणूक आयोगाकडे मागणी

- Advertisement -

येत्या 10 दिवसांत विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या दहा दिवसांत मतदारांचे मन वळविण्याचे आव्हान नेत्यांपुढे आहे. त्यातही यंदा मान्सून लांबल्याने पाऊस केव्हा येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभा रस्त्यावर घेण्याची परवानगी मनसेनं निवडणूक आयोगाकडे मागितली आहे. रस्त्यांवर सभा घेण्यास परवानगी द्या अशी मागणी करणारं पत्र मनसेनं राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लिहिलं आहे.

Related Posts

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- नरेंद्र मोदी

Loading...

- Advertisement -

राज ठाकरेंची काल पुण्यात सभा होती. मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्यानं ही सभा रद्द करावी लागली, याचा उल्लेखदेखील पत्रात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार परतीचा पाऊस २०-२१ ऑक्टोबरपर्यंत लांबू शकतो. असं झाल्यास आमचे उमेदवार प्रचारापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रचार सभांसाठी रस्ते उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील मैदानं आरक्षित करण्यात आली आहेत. मात्र पावसामुळे मैदानांमध्ये पाणी साचत असल्यानं मनसेसह सर्वच राजकीय पक्षांच्या सभा रद्द कराव्या लागत आहेत. पावसामुळे मैदानात चिखल होतो आणि पाऊस थांबला तरी चिखलामुळे सभा घेणं शक्य होत नाही, असं मनसेनं निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.