मनसे उमेदवाराच्या बंधूचे अपहरण, काल सायंकाळपासून आहेत गायब

उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जालिंदर कोकणे यांचे बंधू रमेश कोकणे हे शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवसापासून गायब आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सूडबुद्धीने आणि राजकीय षडयंत्र रचून बंधू रमेश कोकणे यांचा अपहरण करण्यात आल्याचा आरोप मनसेचे उमेदवार जालिंदर कोकणे यांनी केला आहे.

शनिवारी सांयकाळी 6 च्या सुमारास ते अचलेर जवळील रस्त्यावर वाहन थांबवून टॉयलेटला गेले होते. मात्र दोनतास होऊनही वाहनाकडे ते आलेच नाही. त्यांचा मोबाईल देखील वाहनात होता. त्यामुळे त्यांच्या वाहनाच्या चालकाने ही माहिती कोकणेंच्या घरच्यांना कळवली. यावरून उमेदवार कोकणे यांनी रात्री 10 च्या सुमारास स्वतःहून मुरूम पोलिसांना माहिती दिली. यावरून पोलिसांनी अचलेर भागातील घटनास्थळी दाखल होवून रमेश कोकणे यांचा शोध घेतला. मात्र काही तपास हाती लागले नाही. पोलिसांनी घटनास्थळी असलेले रमेश कोकणे यांचे वाहन आणि मोबाईल ताब्यात घेतले आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.