InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भेट झाल्याने दोन्ही नेंत्यांमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. राज आणि पवार यांची गेल्या काही महिन्यांपासूनची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे.

मनसे आगामी लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे राज ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.  तसेच काल झाल झालेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. यापुढील प्रत्येक सभा ही नरेंद्र मोदी आणि शहा यांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.