मोदींनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

ंनी काल पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. पहिल्या वहिल्या पत्रकार परिषदेमुळे ती बरीच चर्चेचा विषय ठरली, मात्र त्याचा भ्रमनिरास झाला, त्यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिली नाहीत. मोदींना विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांना भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी उत्तरे दिली. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. आमचा पंतप्रधान पत्रकारांना सामोरा जायला घाबरतो, अशी टीका महिन्याभरापूर्वी करणाऱ्या मनसे प्रमुख ंनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला.

‘पंतप्रधानांची पत्रकार परिषद… ‘मौन की बात’!’, असं ट्विट करत राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली. काल मोदींनी अमित शहांसह पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. यानंतर मोदींनी पत्रकारांना संबोधण्यास सुरुवात केली. सरकारचे प्रमुख म्हणून मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देतील, अशी आशा होती. मात्र त्यांनी एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.