‘कोण नितीन नांदगावकर ?’; नितीन नांदगावकर यांच्यावर मनसेची जहरी टीका

मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस आणि आपल्या आक्रमक शैलीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारे नितीन नांदगावकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. मनसेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाही नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत जाणं पसंत केलं. त्यानंतर आता मनसेचे नेते आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवार राजू पाटील यांनी नितीन नांदगावकरांवर जोरदार टीका केली आहे.

‘कोण नितीन नांदगावकर ? आमच्या पक्षामध्ये नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आणि आमच्यासारखे मनसैनिक आहेत,’ असं म्हणत राजू पाटील यांनी नितीन नांदगावकर यांच्यावर निशाणा साधला. नांदगावकर यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेतून त्यांचा शिवसेना प्रवेश मनसे नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.