स्टेट रजिस्टर ऑफ सिटीझन संपूर्ण देशात लागू करण्यात यावे; संदीप देशपांडे यांची मागणी

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन प्रमाणेच स्टेट रजिस्टर ऑफ सिटीझन संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन अर्थात एनआरसी हे सर्वप्रथम आसाममध्ये लागू करण्यात आले होते. ज्यानुसार 24 मार्च 1971 पर्यंत नोंद असणाऱ्यांनाच भारताचे नागरिकत्व लागू राहील.

आसाम प्रमाणेच एनआरसी कायदा संपूर्ण देशात लागू केला जाईल, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर एसआरसी लागू करावी म्हणजे राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांवर निर्बंध येईल आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल असे ट्वीट काल संदीप देशपांडे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.