MNS on Congress | भारत जोडो नाही तर ‘कॉंग्रेस जोडो यात्रा’ काढण्याची कॉंग्रेसला गरज ; मनसेची टीका

MNS on Congress | मुंबई : महाराष्ट्र काँग्रेस भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) माध्यमातून शिक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल होणार आहे. दरम्यान यात्रेवर मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी टीका केली आहे.

“कॉंग्रेसची जोडो यात्रा महाराष्ट्रात येणार आहे त्या मुहूर्तावरच महाविकास आघाडी मधल्या घटक पक्ष असलेल्या शिल्लक सेनेचे ज्योतिषी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी कॉंग्रेसचे २२ आमदार फुटणार म्हणून भाकीत केलेलं आहे. हा तर कॉंग्रेसच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. हे सरकार स्थापन करत असताना कॉंग्रेसचे अनुपस्थित असलेले आमदार असोत किंवा विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी उपस्थित असलेले कॉंग्रेसचे आमदार स्वपक्ष उमेदवाराला मतदान न करणे असो, हे तर लक्षातच येत होते की भारत जोडो नाही तर कॉंग्रेस जोडो यात्रा काढायची गरज कॉंग्रेसच्या नेतृत्वाला आहे”, असे गजानन काळे यांनी म्हटले आहे.

मात्र आता चंद्रकांत खैरेंच्या विधानामुळे काँग्रेस नेतृत्व शिल्लक सेनेच्या नेत्यांना निषेध म्हणून या यात्रेत सहभागी करून न घेण्याचा निर्णय घेईल का? हे पाहण्यासारखे आहे, असा सवाल देखील गजानन काळे यांनी उपस्थित केला.

काँग्रेसशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचे स्वागत करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार हे ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर दरम्यानच्या यात्रेत सामील होणार आहेत. भारत जोडो यात्रा १४ दिवस महाराष्ट्रातून जाणार आहे.  राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून १४  दिवस ही यात्रा तब्बल ३८४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.