मनसे पुण्यात सर्व जागा लढविणार…

लोकसभा निवडणूकीत एक पाऊल मागे घेत निवडणूका न लढविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला होता. मात्र, कार्यकर्त्यांच्या रेटयापुढे आता पक्षाने विधानसभा निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतला असून पुण्यातील आठही जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. दरम्यान, पुण्यातील उमेदवारांची यादी निश्‍चित झाली असून या महिन्याच्या अखेरीस ती जाहीर केली जाणार असल्याची माहिती नेते बाबू वागसकर यांनी प्रभातशी बोलताना दिली. त्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत इच्छूकांच्या बैठका सुरू असल्याचेही ते म्हणाले. तसेच पुण्यातून प्रत्येक मतदारसंघासाठी दहा पेक्षा अधिक इच्छूकांनी तयारी दर्शविली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात मनसेकडून आठही जागांसाठी इच्छूक आग्रही आहेत. त्यानुसार, पक्षाकडून सर्व आढावा घेतला असून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातही 10 ते 12 ठिकाणी पक्षाकडून उमेदवार दिले जातील. पक्षाची पुण्याची यादी तयार असून इच्छूकांना मुंबईत बोलवून त्यांच्याशी सुरू आहे. पक्षाची यादी या महिना अखेरीस जाहीर केली जाईल.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.