Mobile Number | सरकारचा नवीन नियम! शॉपिंग करताना मोबाईल नंबर देणं सक्तीचं नाही

Mobile Number | टीम महाराष्ट्र देशा: मॉलमध्ये किंवा एखाद्या दुकानामध्ये खरेदी करत असताना तुम्हाला बिलिंग काउंटरवर बिल देण्यापूर्वी मोबाईल नंबर द्यावा लागतो. काहीच गरज नसताना आपण त्याठिकाणी मोबाईल नंबर देऊन टाकतो. ही पद्धत बंद करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार ग्राहकांना बिल देण्यापूर्वी मोबाईल नंबर देण्याची गरज नाही.

Giving mobile number while shopping is not mandatory

बिल देण्यापूर्वी प्रत्येक वेळी मोबाईल क्रमांक (Mobile Number) विचारण्याच्या पद्धतीवर सातत्याने ग्राहकांकडून तक्रारी नोंदवल्या जात होत्या. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार, ही एक प्रतिबंधात्मक आणि अन्यायकारक व्यवहार पद्धत आहे. ग्राहकाची माहिती गोळा करण्यामागे कोणतेही कारण नाही. त्यामुळे ग्राहकाची संमती नसल्यास मोबाईल नंबर घेऊ नये.

भारतामध्ये खरेदी केल्यानंतर ग्राहकांनी विक्रेत्यांना आपला मोबाईल नंबर (Mobile Number) देणे बंधनकारक नाही. मात्र, तरीही अनेकदा ग्राहकांना आपला नंबर द्यावा लागतो. अधिकाऱ्यांनी या मुद्द्याला गोपनीयतेची चिंता म्हटलं आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं  आहे की, जर एखाद्या ग्राहकाला आपला मोबाईल नंबर द्यायचा नसेल तर विक्रेता त्याचा आग्रह धरू शकत नाही.

दरम्यान, ग्राहकांच्या हितासाठी या समस्येचे निवारण म्हणून रिटेल उद्योग आणि उद्योग संघटना कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) आणि FICCI सारख्या संस्थांना सूचना पाठवल्या जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3q60fPO