KRK वर मॉडेलने केला बलात्काराचा आरोप; FIR ची कॉपी व्हायरलं

मुंबई : बॉलीवूड अभिनेता कमाल आर. खान नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. त्याला यामुळे अनेकदा ट्रोल देखील केले जाते. मात्र यावेळी केआरके कोणते वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नाही तर एका तरुणीनं त्याच्यावर चक्क बलात्काराचा आरोप केल्यामुळे चर्चेत आला आहे.

माहितीनुसार आरोप करणारी तरुणी एक फिटनेस मॉडेल आहे. तिने मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये केआरके विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. या तरुणीच्या FIR ची कॉपी सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. केआरके अद्याप या प्रकरणावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

यापूर्वी केआरकेने पॉझिटिव्ह रिव्ह्यूसाठी 25 लाखांची मागणी करत असतानाची एक क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे इंडस्ट्रीमधील कलाकारांना तो ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले होते. निर्माता रोहित चौधरीने ही क्लिप सोशल मीडियावर शेअर केली होती.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा