राज कुंद्रावर आरोप केल्यामुळे मॉडेल सागरिका अडचणीत; मिळतायेत बलात्कार आणि जिवेमारण्याच्या धमक्या

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे यावर काही महिन्यांपूर्वी राजवर न्यूड ऑडिशनची मागणी केल्याचा आरोप करणारी मॉडेल सागरिका शोना सुमनला राजच्या विरोधात बोलल्यामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याची माहिती सागरिकाने दिली आहे.

सागरिकाने फेब्रुवारी २०२०मध्ये राजवर न्यूड ऑडिशनची मागणी केल्याचा आरोप केला होता. परंतु, आता राजला अटक झाल्यानंतर सागरिकाला अनेक माध्यमांद्वारे संपर्क करून धमकावण्यात येत असल्याचं तिने सांगितलं. सागरिकाने म्हटलं, ”मी जेव्हापासून राज कुंद्रा विरोधात बोलली आहे, तेव्हापासून मी खूप वैतागली आहे. मला अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून कॉल येतायत. ते मला धमकी देत आहेत. मला वारंवार बलात्काराची आणि जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. मला लोक वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून विचारतात की राजने काय चूक केली?”

सागरिका पुढे म्हणाली, ”माझ्यावर त्यांचा व्यवसाय बंद पाडण्याचा आरोप केला जातोय. ते लोक म्हणतात की, ‘तुम्ही अश्लील व्हिडिओ पाहता म्हणून आम्ही बनवतो. मला त्या लोकांपासून जीवाचा धोका आहे. त्यामुळे मी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.'” असं सागरिका म्हणाली.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा