InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

काँग्रेसने पवारांचा अपमान केला तरीही पवार काँग्रेससोबतच – मोदी

शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. परंतु काँग्रेसने त्यांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली आहे. तरीदेखील पवार आज पुन्हा त्याच काँग्रेससोबत गेले, याची मला खंत वाटते. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

बुधवारी मोदी यांनी बारामतीसह हिंगोली, नंदुरबार, नांदेड, गडचिरोली इथल्या भारतीय जनता पक्षाच्या बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मोदी म्हणाले की, काँग्रेसमध्ये असताना शरद पवारांना कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी काँग्रेसने त्यांचा अपमान करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. पण काँग्रेसने त्यांना पक्षामधून बाहेर काढले. तरिही पवार आज पुन्हा त्याच काँग्रेससोबत गेले आहेत, याची खंत वाटते.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.