‘370’चा महाराष्ट्राशी संबंध काय विचारणाऱ्यांनो, ‘डुब मरो’; मोदींची पवारांवर टीका

पंतप्रधान यांनी महाराष्ट्र विधानसभा ीच्या ामध्ये वरून ांसह विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. हटवल्याने देशातील जनता आनंदी आहे. मात्र या निर्णयामुळे काही जणांचा चेहरा उतरला आहे. त्यांना त्रास होत आहे. अशी मंडळी चा महाराष्ट्राशी काय संबध आहे, असा सवाल विचारत आहेत. चा महाराष्ट्राशी संबंध काय असे विचारणाऱ्यांनो डूब मरो, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा आज अकोला येथे झाली यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ” शी महाराष्ट्राशी देणंघेणं नाही, असं म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. अशा लोकांनी कान उघडून उघडा की, जम्मू काश्मीर आणि तेथील जनता ही भारतमातेचीच लेकरे आहेत. आज संपूर्ण देश एक होऊन काश्मीरच्या मागे उभा आहे. देशाच्या रक्षणासाठी या शिवरांयांच्या भूमीतील मावळे हौतात्म्य पत्करत आहेत. आणि तुम्ही चा महाराष्ट्राशी काय संबंध म्हणून विचारणा करता.” असे मोदी म्हणाले.

मतांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा फार नुकसान झाले असेही त्यांनी सांगितले.”मतांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले आहे. एकेकाळी महाराष्ट्रात बॉम्बस्फोट व्हायचे. मुंबईत, ट्रेन, बस, महत्त्वाच्या इमारतींमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे. पण याबाबत ज्या लोकांकडे संशयाची सुई गेली ते देश सोडून पळाले. त्यांनी शत्रू राष्ट्रांत बस्तान बसवले. हे कसे झाले. एवढे मोठे गुन्हेगार देशाबाहेर कसे काय पळाले,”असा सवालही मोदींनी शरद पवार आणि अन्य नेत्यांचं नाव न घेता उपस्थित केला.

यावेळी सरकारी संस्थांवर करणाऱ्यांवरही मोदींनी केली. अनेक भ्रष्टाचाऱ्यांचे एक ना एक दिवस पितळ उघड पडणार होतं. त्यामुळे जनतेला उत्तर द्यावं लागेल याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे त्यांनी खोट्याची मदत घेऊन विविध संस्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली. संकट आलं की खोट्याची मदत होईल असं वाटलं होतं. पण वेळ बदलली आहे. तुमच्या प्रत्येक कृतीचा जाब देश विचारल्याशिवार राहणार नाही, असा टोलाही मोदींनी लगावला. काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या भ्रष्टवादी युतीने राज्याला अनेक वर्षे मागे लोटले अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.