InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदी सरकारने वाहनांसंबंधी डाटा विकून केली कोट्यावधीची कमाई – गडकरी

मोदी सरकारने वाहनांची नोंदणी आणि वाहन चालविण्याच्या परवान्याचा डाटा विकून कमाई केल्याची माहिती रस्ते व वाहतकू आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

बल्क डाटा शेअरिंग धोरणानुसार खासगी कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांना डाटा एक्सेसची परवानगी दिली जाते. या धोरणाअंतर्गत सरकारने आतापर्यंत डाटा विकून 65 कोटीची कमाई केली आहे. सरकारने आतापर्यंत 87 खासगी आणि 32 सरकारी कंपन्यांना वाहनांचा डाटा विकला आहे. यासाठी शैक्षणिक संस्थेकडून एका वर्षासाठी 3 कोटी आणि सरकारी संस्थांकडून 5 कोटी रुपये घेतले जातात.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply