मोदी सरकारनं स्मशानं चिरेबंदी आणि गंगा मलीन केली, अशोक चव्हाण यांची केंद्रावर घणाघाती टीका

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन ७ वर्षांचा कालावधी पुर्ण झाला आहे. यानिमित्ताने काँग्रेसने भाजप आणि मोदी सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचला आहे. राज्यभरात निदर्शनं करत काँग्रेसकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. अंतिम संस्काराचा अंतिम अधिकार नाकारण्यासारखे दुसरे कोणते पाप असू शकत नाही. पण ते पापसुद्धा मोदी सरकारच्या काळात झाले. पत्रे ठोकून स्मशाने चिरेबंदी आणि वाहत्या प्रवाहात व किनाऱ्यावर शेकडो मृतदेह सोडून गंगेला मलीन करण्याचे महापाप या सरकारने केले, अशी घणाघाती टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने औरंगाबाद येथील प्रसारमाध्यमांशी ऑनलाईन संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक विलास औताडे, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिशाम ओस्मानी, प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील आदी उपस्थित होते.

मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा करताना चव्हाण यांनी राज कपूर यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटातील ‘राम तेरी गंगा मैली हो गई, पापीयों के पाप धोते-धोते’ या गाण्याचा संदर्भ दिला. मोदी सरकारच्या कारभारातून या गाण्याचे स्मरण होते, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा