InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘मोदी सरकार नेहरूंचा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.’

यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारवर टीका केली आहे. सध्या सरकारमध्ये बसलेले लोक पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचे पुस्तक ‘नेहरु: द इन्वेंशन ऑफ इंडिया’ या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी त्या बोलत होत्या. काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या धोरणांमुळे देशाला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभल्याचे त्यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply