InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आता लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार…?

विधानसभा निवडणुकीत तीन राज्यातील पराभवानंतर मोदी सरकार आज मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनीआज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोदी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. मोदी सरकार तब्बल ४ लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करण्याचा अंदाज आहे.

एनडीए सरकारसमोर आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचं मोठं आव्हान आहे. अशातच जनमानसात भाजपाबद्दल विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याबरोबरच शेतकरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी ही कर्जमाफीची घोषणा करण्यात येऊ शकते. तीन राज्यांत शेतकऱ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात असलेल्या नाराजीमुळेच भाजपाला सत्ता गमवावी लागल्याची चर्चा आहे. आता त्याचीच दखल घेत भाजपा ही कर्जमाफी करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply