InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदी सरकार महिलांच्या बाबतीत असंवेदनशील

“मोदी सरकार महिलांच्या बाबतीत असंवेदनशील असल्यामुळे गेल्या पाच वर्षांत या सरकारने महिलांचे नाव पुढे करत केवळ घोषणा आणि जाहिरातबाजी केली. मात्र, प्रत्यक्षात महिलांसाठीच्या अनेक योजना बंद पाडल्या,’ असा आरोप आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी पुण्यात केला.

“सत्तेत येण्यासाठी मोदी सरकारने 2014 च्या निवडणुकीत ज्या घोषणा केल्या, त्याची कोणतीही अंमलबजावणी केली नाही असे देखील वंदना चव्हाण यावेळी म्हणाल्या.

पुणे लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मोहन जोशी यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मोहन जोशीचे शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply