InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मोदी ठरले निर्दयी; लावले स्मशानभूमीला कुलूप; केले तीन विवाह रद्द….

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी कल्याणला येणार म्हणून आता तर प्रशासनाने हद्दच केली आहे. मोदी येणार म्हणून कल्याणमधील स्मशानभूमी बंद ठेवण्यात आलीय.

सुरक्षेसाठी स्मशानभूमीला कुलूप ठोकण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. मोदी कल्याणमध्ये असेपर्यंत एकही अंत्ययात्रा लालचौकी स्मशानभूमीत येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिलेत. तसेच तीन लग्न सोहळे रद्द करणाऱ्या प्रशासनाने रद्द केले.

पंतप्रधान मोदींचा दौरा जाहीर होताच पालिकेने फडके मैदान ताब्यात घेतले. इतकेच नव्हे तर मैदान आणि शेजारील वाधवा हॉल येथील तीन नियोजित विवाहसोहळे तडकाफडकी रद्द केले. याचा मोठा मनस्ताप वर आणि वधू पक्षाला झाला.

- Advertisement -

पंतप्रधानांच्या सोईसाठी ही व्यवस्था करण्यात आली असली तरी ती नागरिकांसाठी गैरसोय ठरतेय. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन, पालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने कल्याणकरांना वेठीस धरल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.