“मोदींनी देशाला एवढ्या उंचीवर नेलंय की आता ऑक्सिजन कमी पडतोय”

“कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत तग धरून आहे तो नेहरू-गांधी यांच्यामुळे ७० वर्षांपासून पंडित नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प आणि आत्मविश्वासावरच,” असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं होतं. यावर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मात्र, अनेकांनी पात्रा यांनाच ट्रोल केल्याचं चित्र दिसत आहे.

शिवसेनेनं केलेल्या टीकेची इंग्रजी बातमीवर प्रतिक्रिया देताना पात्रा यांनी, “हे चूकून छापलं आहे की ते खरोखर असं म्हणालेत?” असं ट्विट केलं. पात्रा यांनी कोट करुन रिट्विट केलेल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो होता.

नायक हसन नावाच्या एका युझरन ट्रोल करत असं म्हंटल आहे की, “भारत गांधी-नेहरु यांनी बनवलेल्या योजनांवर पुढे जात आहे की नाही ठाऊक नाही, मात्र मोदी आणि शाह यांच्यामुळे भारत मरतोय हे मात्र नक्की,” असा टोला लगावला आहे. गौरव जैन नावाच्या व्यक्तीने, “मोदी देशाला एवढ्या उंचीवर घेऊन गेलेत की आता ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागलीय. मात्र ही गोष्ट मोदी विरोधकांना समजणार नाही” असा उपरोधिक टोला लगावलाय.

निलेश शर्मा यांनी, “सत्य कटू असतं. लसीसुद्धा काँग्रेसने निर्माण केलेल्या संस्थांमध्येच तयार केल्या जात आहेत. ऑक्सिजनसुद्धा काँग्रेसने निर्माण केलेल्या नवरत्न कंपन्यांमध्ये तयार होत आहे. उपचारही काँग्रेसने तयार केलेल्या रुग्णालयांमध्ये सुरु आहेत. भाजपा आणि मोदींनी तयार केलेली जगातील सर्वात उंच काँग्रेस नेत्याचा पुतळा काही उपयोगाला आला नाही,” अशी टीका केलीय.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा