राफेल घोटाळा लपवण्यासाठी मोदींनीच कागदपत्रे जाळली, अजित पवारांची मोदींवर टीका

काल सर्वोच्च न्यायालयात राफेल विमान घोटाळ्याप्रकरणी सुनावणी करण्यात आली. यावेळेस महाधिवक्त्यांनी संरक्षण मंत्रालयातून राफेल खरेदीव्यवहाराची कागदपत्रेच चोरीला गेल्याची माहिती दिली. यावरून राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. राफेल घोटाळा लपवण्यासाठी मोदींनी राफेलच्या फाईल जाळल्याचा आरोप, अजित पवार यांनी केला आहे.

पुलवामा हल्ल्याचा राजकीय फायदा भाजपा घेत आहे. पाकिस्तानवर हवाई हल्ला करण्याचे श्रेयही भाजपाचे नेते लाटत आहेत. किती दहशतवादी मारले गेले हे सांगण्याचे अधिकार वायुसेनेला आहेत. मात्र, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष एक तर अन्य नेते वेगवेगळा आकडा सांगत फिरत आहेत. त्यांना आकडेवारी जाहीर करण्याच अधिकार आहे का, असा सवालही पवार यांनी विचारला. तसेच पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यात स्फोटकांनी भरलेली गाडी घुसलीच कशी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.