InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘जॉनी जॉनी येस पापा’ कवितेच्या माध्यमातून ‘राजद’चा मोदींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राष्ट्रीय जनता दलानं कवितेतून निशाणा साधला आहे. ‘जॉनी जॉनी येस पापा’ कवितेचं विडंबन करत राजदनं विकास, रोजगार, काळा पैसा, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रीय जनता दलाने उपस्थित केले आहेत. देशातल्या समस्यांशी मोदींना काही देणंघेणं नसून केवळ जुमलेबाजी सुरू असल्याचा टोला कवितेतून लगावण्यात आला आहे.

‘भविष्यात मोदी भक्तांची मुलं ही कविता म्हणतील. मोदी मोदी येस पापा.. अ‍ॅनी डेव्हलपमेंट? नो पापा.. फार्मर हॅप्पी? नो पापा… वूमन सेफ? नो पापा… 10 करोड जॉब? नो पापा… 15 लाख? नो पापा… ओन्ली जुमला? हा हा हा…,’ असं ट्विट राजदनं केलं आहे. राजदकडून याआधीही अनेकदा मोदी, भाजपा आणि भाजपाच्या मित्रपक्षांवर निशाणा साधण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.