InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘निवडणुक आल्यावर आता मोदींना रामाची आठवण आली’

गेली साडेचार वर्षे मोदींनी रामाच्या हिताची जपणूक केली नाही. पण निवडणुक आल्यावर त्यांना रामाची आठवण झाली. विकासाच्या दृष्टीने जे स्वप्न दाखविले, त्यातून काहीही झालेले नाही. त्यामुळे जनता आपल्यापासून दूर जातेय हे पाहून त्यांनी आता रामाच्या नावाचा जप सुरू केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मोदी व भाजप सरकारवर केली.

पवार म्हणाले “आज देशाचे राजकारण बदलले आहे. साडेचार वर्षापूर्वी विकासाच्या नावाखाली वेगळे वातावरण निर्माण केले. लोकांना वाटले काहीतरी भयंकर करून दाखविणार आहेत, आपण त्यांना संधी द्यावी आणि लोकांनी संधी दिली. मुठभर हिताची जपणूक करणारे आणि धार्मिक, जातीयवादाचा पुरस्कार करणारे राज्यकर्ते आज देशात राज्य करतात. हे आता देशातील जनतेच्या लक्षात आले आहे. राम मंदीराच्या नावाखाली गेली दहा वर्षे राजकारण केले आहे. अटलबिहारी पंतप्रधान असताना सत्ता हातात होती. गेली साडेचार वर्षे मोदींना सत्ता हातात असताना कधी त्यांना रामाची आठवण झाली नाही. पण निवडणुक आल्यावर रामाची आठवण झाली आहे.”

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply