“…म्हणून 2024ला मोदींची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी होणार”

मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक मोठा दावा केला आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी होणार आहे, असे स्पष्ट मत लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केले आहे. लालू प्रसाद यादव यांनी अनेक दिवसांनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी द क्विंट या वृत्तसमुहाला त्यांनी मुलाखत दिली आहे.

या मुलाखती दरम्यान त्यांनी ही वक्तव्य केली आहेत. देशातील जनता वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे अतिशय कंटाळली आहे. त्यामुळे जनता पंतप्रधान मोदींना टिकू देणार नाही. २०२४ मध्ये त्यांची हकालपट्टी केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा लालूप्रसाद यांनी केला आहे.

दरम्यान, पुढचा पंतप्रधान कोण असेल, असे विचारले असता लालू यांनी यावर नंतर चर्चा केली जाईल असे म्हटले आहे. राहुल गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे का, असेही विचारण्यात आले. यावर उत्तर देताना “एक व्यक्ती काय बोलते किंवा विचार करते याने फरक पडत नाही. त्यामुळे याचे उत्तर आपण नव्हे तर काँग्रेस पक्ष देईल.” असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा