“मोदी सर्वोच्च न्यायालयाचं पण ऐकणार नाहीत मग कोणाचं ऐकणार आहेत?”

मुंबई : इस्रायलच्या ‘पेगॅसस स्पायवेअर’चा वापर करून नामवंत व्यक्तींवर पाळत ठेवण्याच्या आरोपाबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणास्तव नकार दिला. यामुळे सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतरिम आदेश देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाला सरकारने त्या सॉफ्टवेअरचा उपयोग बेकायदा केला नाही हे जाणून घ्यायचे आहे. पण तरीही सरकारने प्रतिज्ञापत्रास नकार दिला.

यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहे. पेगॅससच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज स्थगित झाले. देशात राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पेगॅसस प्रकरणाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली केंद्र सरकार देशातील विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुद्धा सरकार याबद्दल काही सांगण्यास तयार नाही. केंद्र सरकार नेमकं काय लपवत आहे. सरकार आता सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा मानत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. केंद्र सरकारने देशातील सर्वोच्च न्यायालयाचं तरी ऐकायला पाहिजे. मोदी आता सर्वोच्च न्यायालयाचं पण ऐकणार नाहीत मग ते कोणाचं ऐकणार आहेत. या शब्दात राऊत यांनी केंद्र सरकारवर जहरी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा