InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘मोदी तुम्ही स्वतःच्या बायकोची काळजी घेतली नाही, देशाची काय घेणार?’

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकात्यामधील रोड शोमध्ये दगडफेक झाली. या रोड शो दरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. भाजपने यासाठी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांनी जबाबदार धरले. तर तृणमूल काँग्रेसने भाजपने बाहेरून माणे बोलवून हिसांचार घडवला असा, आरोप केला. यानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकांचा प्रचार एक दिवस आधीच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी, तुम्ही तुमच्या पत्नीची काळजी घेतली नाही. देशाची काळजी तुम्ही काय घेणार?, असा सवालच मोदींना केला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, रोड शोदरम्यान हिंसाचार घडवून आणण्यासाठी भाजपवाल्यांनी बाहेरुन गुंड आणले होते. बाबरी मशीद पाडल्यानंतर जसा हिंसाचार झाला होता, तसाच हिंसाचार बंगालमध्ये झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply