मोदीजी आणखी १० वर्ष पंतप्रधान रहावेत; कमाल आर खानची देवाकडे इच्छा

कमाल आर खान हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कोणीही विचारले नसताना त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्विटकडे फारसे लक्ष देत नसले तरी युजर्स मात्र त्याच्या ट्विटची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याला अनेक वेळा ट्रोल करतात. आता तर आर खानने ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढचे आणखी १० वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून रहावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

कमाल आर खानने “मी देवाकडे प्रार्थना करतो की मोदीजी हे पुढचे आणखी १० वर्षे पंतप्रधान रहावेत. कारण मला भक्तांना रस्त्यावर गळ्यात झोळी आणि अंतर्वस्त्र परिधान केलेल्या वेशात पाहायचे आहे” या आशयाचे ट्वीट केले आहे. त्याच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्याअसून सध्या हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

एकीकडे पाहिले तर केंद्रसरकरवर प्रत्येकजन टिकाच करताना दिसत आहेत तर, इकडे आर खानचे असे ट्विट चर्चेचाच विषय बनला आहे. बऱ्याचवेळा त्याचे ट्विट्स वादांना पेटवण्याचे काम करते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा