InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘मोदीजी, तुम चाय बेचते थे तो मैं मुंबई के मार्केट मे सब्जी बेचता था’

“चहावर यांचं जास्त प्रेम. तुम चाय बेचते थे तो मैं मुंबई के मार्केट मे सब्जी बेचता था. मैं किधर बेचता था ये सबको मालूम है लेकिन आप किधर चाय बेचते थे? प्रवीण तोगडिया पण सांगत आहेत वो किधर बेचते थे किसको भी नही मालूम! चाय बेचो लेकिन देश मत बेचो, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मोदी  लहाणपणी चहा विकत असल्याच्या दाव्याच्या खिल्ली उडविली.

भाजप सरकारची आश्वासने म्हणजे सर्व भूलथापा आहेत. स्वातंत्र्य राहिलेलं नाही. पारतंत्र्यात असल्यासारखे वाटत आहे. शेतकऱ्यांपुढे अनंत अडचणी आहेत. कांदा फेकण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याचा पत्ता नाही. काही जणांना अजून आशा असेल पण हा तर जुमला आहे. दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते पण अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अशा शब्दांत त्यांनी टिकेचे आसूड ओढले.
महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.