InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ हा संपूर्ण देशावरचा काळा डाग आहे’

लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असताना, आता बसपाच्या अध्यक्षा मायावती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरूच आहे. मोदींनी मायावतींच्या मुख्यमंत्री पदावर टीका केली होती.

मायावती जितक्या काळ उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री होत्या त्याच्यापेक्षा अधिक काळ मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो., असे मोदींनी वक्तव्य केले होते, त्यावक मायावतींनी उत्तर दिले आहे.

गुजरातमधील मोदींचा कार्यकाळ हा केवळ भाजपावरचाच नाही तर संपूर्ण देशावरचा काळा डाग आहे., असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

जेव्हा बसपा उत्तर प्रदेशात सत्तेत होती तेव्हा उत्तर प्रदेश दंगली आणि अराजकतामुक्त होता, असेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply