Mohammad Rizwan | “टीम इंडियाला हरवल्यानंतर आम्हाला सगळं…”; मोहम्मद रिझवानने केले वक्तव्य

Mohammad Rizwan | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघाला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या (T-20 World Cup) उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघ या पराभवातून सावरत सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पाकिस्तानचा देखील पराभव झाला होता. पाकिस्तान संघ या धक्क्यातून सावरत घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) ने एक खुलासा केला आहे. यामध्ये तो म्हणाला आहे की’ “टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताविरुद्धचा विजय नेहमी लक्षात राहील.”

मोहम्मद रिझवान हा पाकिस्तान संघातील खूप महत्त्वाचा फलंदाज आहे. हा खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये महत्त्वाचे योगदान देतो. गेल्या वर्षी झालेल्या सर्वसामान्यांमध्ये मोहम्मद रिझवानने महत्त्वाची खेळी खेळली होती. तर, टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये देखील त्याने उत्तम कामगिरी केली होती. टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तान संघाने 10 गडी राखून भारताचा पराभव केला होता.

पाकिस्तान संघाने पहिल्यांदाच विश्वचषक सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभूत केले होते. या स्पर्धेमध्ये भारतीय संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. तर, पाकिस्तान संघ उपांत्य फेरीमध्ये पराभूत झाला होता. या स्पर्धेनंतर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान बरोबर असे काही घडले, जे तो नेहमी लक्षात ठेवेल.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मोहम्मद रिझवान म्हणाला की,”भारता विरुद्ध सामना जिंकल्यावर आम्हाला असे वाटले की, हा एक सामान्य सामना झाला. कारण हा सामना आम्ही सहज पद्धतीने जिंकून पाकिस्तानला परतला होतो. पाकिस्तानला परतल्यानंतर आम्हाला कळलं की हा विजय किती खास आहे. कारण जेव्हा मी कुठल्याही दुकानात जायचं तेव्हा माझ्याकडून पैसे घेतले जात नव्हते. दुकानदार मला म्हणायचे तुम्ही पैसे देऊ नका. पाकिस्तानातील दुकानदार म्हणायचे इथे तुमच्यासाठी सगळं फुकट आहे. भारताला पराभूत केल्यानंतर पाकिस्तान मध्ये आम्हाला या पद्धतीचे प्रेम मिळत आहे.”

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.