Mohammed Shami : मोहम्मद शमी भारत-पाक सामन्यात गोलंदाजी करणार नाही; या माजी खेळाडूने सांगितले मोठे कारण

Mohammed Shami । नवी दिल्ली : T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची प्रतीक्षा संपली आहे. मेलबर्नच्या मैदानावर आज दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याबाबत अनेक दिग्गज आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यात भारताचा माजी खेळाडू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचंही नाव आहे. या सामन्यासाठी त्याने भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याच्या जागी हर्षल पटेल (Harshal Patel) याची निवड केली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात मोहम्मद शमीने चांगली कामगिरी केली होती. कांगारू संघाविरुद्ध त्याने फक्त एकच षटक टाकले ज्यात त्याने 3 बळी घेत सर्वांना प्रभावित केले. असे असूनही अनिल कुंबळे यांनी त्याला पाकिस्तानविरुद्ध निवडले नाही. कुंबळे यांच्या मते हा संघ हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमारसोबत मैदानात उतरेल.

ईएसपीएन क्रिकइन्फोवरील चर्चेदरम्यान, दिग्गज म्हणाला, ‘हर्षल पटेल विश्वचषकाचे नेतृत्व करणार्‍या बॉलिंग लाइनअपचा एक भाग आहे, तो मधल्या षटकांपासून शेवटपर्यत गोलंदाजी करतो, त्यामुळे मला वाटते की संघ त्याच्याबरोबर जाईल. होय, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात शमीने एका षटकात जे काही करायचे होते ते केले, तसेच तो गेल्या काही काळापासून नवीन चेंडूवर चांगली कामगिरी करत आहे.

तो पुढे म्हणाला, जर तुम्ही शमी आणि भुवीसोबत गेलात तर दोन्ही गोलंदाजांना सुरुवातीला चांगली गोलंदाजी करण्याची भूमिका पार पाडावी लागेल. त्याचवेळी अर्शदीपला मधल्या षटकांमध्ये यावे लागेल. जर तुम्ही असे करत असाल तर तुमची फलंदाजी सातव्या क्रमांकावर मर्यादित आहे. अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन हे दोघेही मैदानात उतरले तर ते ७ किंवा ८ व्या क्रमांकावर येतील. पण त्यानंतर हर्षल पटेल तुम्हाला फलंदाजीसाठी हि उपयुक्त ठरेल.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.