घरी परतणाऱ्या कामगारांना मोहम्मद शमी करतोय ‘अशी’ मदत

लॉकडाउन काळात, देशातील कामगार आणि मजुरांना चांगलेच हाल सोसावे लागले. केंद्र सरकारने त्यांना प्रवासाची परवानी दिल्यानंतर राज्यातील कामगार रेल्वे, बस मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी परतत आहेत.

भुसावळ येथे तरुणावर दोघांकडून गोळीबार

घरी परतणाऱ्या या कामगारांची मदत करण्यासाठी समाजातील अनेक व्यक्ती समोर येत आहेत. लॉकडाउन काळात उत्तर प्रदेशात आपल्या घरी अडकलेल्या मोहम्मद शमीने या कामगारांची मदत करण्याचं ठरवलं आहे.

मोहम्मद शमीने आपल्या सहकाऱ्यांसह घराजवळील जागेत मदतकार्याचा मंडप लावलेला आहे. घरी जाणाऱ्या कामगारांना शमी फळं, जेवणाचं पाकीट आणि पाण्याची बाटली अशी मदत करतो आहे. बीसीसीआयनेही मोहम्मद शमीच्या या मदतकार्याचं कौतुक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा