InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

देशाच्या विकासासाठी मतदान करा – मोहन भागवत

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरूवात झाली. यामध्ये देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी यांनी देखील नागपुरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकशाहीसाठी आणि देशाच्या विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तर भैय्याजी जोशी यांनी नोटा हा पर्याय नसल्याचं मत व्यक्त केलं.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.