InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोहन जोशी यांचा ‘स्वत:च्याच पायावर धोंडा’, फेसबूक व्हिडीओमुळे ट्रोल

‘गुलाल किती उरला रे? पोतभर. काय सांगतो? हो काय करणार आता मिरवणुकीत पहिल्यासारखी  मजाच नाही राहिली राव?’ अशा आशयाचा गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचा संवाद असणारा व्हिडिओ आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी सोशल मीडियावर टाकला खरा पण हा  व्हिडिओ त्यांच्या चांगलाच अंगलट आला. गणेशमंडळांचा कैवार घेऊन  मतांची गोळाबेरीज करू पाहणाऱ्या जोशी यांना फेसबूकवरून नेटीझन्सने प्रचंड ट्रोल केले. पुरोगामी पक्षाला हिंदू सणांचा आताच पुळका कसा येतो? असा प्रतिसवाल नेटीझन्सकडून विचारला गेल्याने  मोहन जोशी यांना  ‘स्वत:च्या पायावर धोंडा’ पाडून घेतल्याचा प्रत्यय आज आला असावा.

गणेशमंडळाची घोर निराशा झाल्याचा धागा पकडत हा  व्हिडिओ तयार करण्यात आला. साहजिक, हा व्हिडीओ प्रसारित केल्याने नेटीझन्स आपल्या सुरात सूर मिसळतील असे त्यांना वाटले असावे. पण घडले उलटेच. ‘तुमचा आणि संस्कृतीचा काय संबंध?’, ‘तुमचेच बेगडी हिंदुत्व,’ ‘आम्हाला हिंदूना कोणी अक्कल शिकवायची गरज नाही.’ ‘ढोंगी पक्ष, जसे आहात तसेच मैदानात उतरा,’  ‘शेवटी आलेच जाती धर्मावर. ,’ ‘अभिनेता मोहन जोशी यांना आम्ही ओळखतो.’ अशा एका वरचढ एक प्रतिक्रियेतून जोशींना पर्यायाने काँग्रेसला नेटीझन्स चांगलेच झोडून काढले.

‘एकीकडे विरोधी पक्षाचे उमेदवार गिरीश बापट आपल्या धडाकेबाज प्रचारातून लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

वैयक्तिक टीकाटिपण्णी टाळून केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचणे, ध्येय त्यांनी समोर ठेवले आहे.पुणेकरांच्या मनात जागा निर्माण करायला मोहन जोशींना खूप परिश्रम घ्यावे लागणार एवढं मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply