Mohommad Shami | ‘ही’ कामगिरी करत मोहम्मद शमीने रचला नवा विक्रम

Mohommad Shami | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघाने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडला 108 धावांमध्ये गुंडाळले. या सामन्यामध्ये भारतीय संघातील स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohommad Shami) ने उत्कृष्ट गोलंदाजी केली. या सामन्यामध्ये त्याने न्यूझीलंडच्या तीन खेळाडूंना बाद केले. या तीन विकेट्सनंतर मोहम्मद शमीने आपल्या नावावर दोन विक्रमाची नोंद केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद शमीने सहा षटके टाकली होती. या षटकांमध्ये त्याने न्यूझीलंडच्या तीन खेळाडूंना पॅव्हेलियनला पाठवले. त्याने 29 व्यांदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. या खेळीनंतर तो भारतीय संघासाठी सर्वाधिक वेळा तीन विकेट घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे.

तीन विकेट्स घेताना मोहम्मद शमीने आणखी एक विक्रम केला आहे. भारतीय संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा मोहम्मद शमी दहावा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 159 विकेट्स आहेत. त्याने तब्बल 87 सामन्यांमध्ये या विकेट्स घेतल्या  आहेत. या यादीमध्ये अनिल कुंबळे यांचं नाव प्रथम क्रमांकवर आहे. त्यांनी 279 सामन्यांमध्ये 334 विकेट्स घेतलेल्या आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडसोबत टी-20 सामने खेळणार आहेत. त्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. 9 फेब्रुवारीपासून ही मालिका सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी कसोटी मालिका भारतीय संघाने जिंकली, तर भारतीय संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे.

महत्वाच्या बातम्या