Money Robbery MLA House | भाजपशी घरोबा असलेल्या आमदाराच्या घरात 25 लाखाची चोरी अन् तीस लाखांच्या खंडणीची मागणी
Mumbai Crime | मुंबई : चोरीच प्रमाण वाढलेले पहायला मिळत असून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) यांच्या मुंबईतील लोढा बॅलोसिमो को-ऑप हौसिंग सोसायटीमधील घरात चोरी झाली आहे. तर ही चोरी श्यामसुंदर शिंदे ड्रायव्हरने केली असल्याचं सांगण्यात येत आहे. ड्रायव्हरने आपल्या मित्राची मदत घेऊन तब्बल 25 लाख रुपये ( Money Robbery) चोरले आहे. तसचं त्याने श्यामसुंदर शिंदे यांच्याकडे 30 लाखांच्या खंडणीचीही मागणी देखील केली आहे.
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या घरात चोरी
याचप्रमाणे ड्रायव्हरने श्यामसुंदर शिंदे यांना धमकावत 1जूनपर्यंत मगितलेलं पैसे मिळाले नाहीत तर सोशल मीडियावरून तुमची बदनामी देखील करेल असं म्हटलं आहे. तर एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये ( N M Joshi Police Station) श्यामसुंदर शिंदे यांनी ड्रायव्हर चक्रधर पंडित मोरे (Chakradhar Pandit More) आणि त्याचा मित्र अभिजीत कदम (Abhijeet Kadam) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Theft in the house of Shyamsunder Shinde
दरम्यान, या प्रकरणी पोलीस त्या दोघांचा तपास घेत असून आरोपी अजूनही फरार असल्याचं सांगितलं जातं आहे. यामुळे त्या परिसर खळबळ उडाली आहे. तर आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये ( BJP) प्रवेश केला. तर आता ते नांदेडमधील लोहा-कंधार मतदारसंघाचे (Loha Kandhar Constituency) आमदार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Shinde Group | मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का! शिंदे गटातील ‘या’ आमदाराची मातोश्रीला परतण्याची विनवणी
- Eknath Shinde | शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार बाहेर पडणार? ठाकरेंच्या विश्वासूनं दिली माहिती
- Sanjay Raut – महाविकास आघाडीत संघर्ष; लोकशाही वाचवण्यासाठी त्याग… – संजय राऊत
- Weather Update | पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्यात ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्याता
- Gautami Patil | ‘पाटील’ हा एक किताब आहे; गौतमी पाटील आडनाव वादावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3oJgLVv
Comments are closed.