Monsoon Session | खोक्यांवर डल्ला, वारकऱ्यांवर हल्ला; सरकार विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
Monsoon Session | मुंबई: राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आज दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे.
आळंदी येथे माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना वारकऱ्यांवर पोलिसांनी हल्ला केला असल्याची माहिती मिळाली होती. त्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं. प्रकरणावरून विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे.
Khokyancha dalla, Varkaryanvar halla
आज विधिमंडळाच्या (Monsoon Session) पायऱ्यांवर वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपरणे, टोपी, टाळ, मृदुंग घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
‘खोक्यांवर डल्ला, वारकऱ्यांवर हल्ला’ अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या आहे. या आंदोलनावरून आज विधिमंडळात काय होईल? यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विरोधकांचं हे आंदोलन (Monsoon Session) सुरू असताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं आहे.
कर्जत-जामखेडच्या तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. पाऊस असो वा इतर कोणताही अडथळा जोपर्यंत माझ्या मतदारसंघातील युवकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हलणार नाही, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
“माझ्या मतदारसंघातील #MIDC चा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही. दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार! आता अखेरचा पर्याय! #उपोषण”, असं रोहित पवार यांनी ट्विट करत (Monsoon Session) म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार – रोहित पवार
- Sanjay Raut | महाराष्ट्रातील राजकारणात निधी वाटप संशोधनाचा झालंय – संजय राऊत
- Ajit Pawar | अजित पवारांनी निधी वाटपामध्ये भेदभाव केला – यशोमती ठाकूर
- Aditya Thackeray | उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही – आदित्य ठाकरे
- Eknath Shinde | कसलं ट्विट आणि कसला भूकंप? मोदी-शिंदेंच्या भेटीचं कारण आलं समोर
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3O86XgJ
Comments are closed.