Monsoon Update | देशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Monsoon Update | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात नवीन अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी 96 टक्के संपूर्ण देशात मान्सून कोसळण्याची शक्यता आहे. तर जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Monsoon will be below average in the country in the month of June

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये जून महिन्यात कमी पाऊस राहील. तर संपूर्ण महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहू शकते. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात मान्सून (Monsoon Update) सामान्य राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. यंदा मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव बघायला मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान देशात 96 टक्के पाऊस कोसळण्याची शक्यता (Monsoon Update) आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतीक्षा असते. या अंदाजावरून शेतकरी पिकांच्या लागवडीचे नियोजन करतात.

दरम्यान, दक्षिण अरबी समुद्रात मान्सून (Monsoon Update) प्रस्थापित होण्यासाठी अजून एक आठवडा लागणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 4 जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल होईल. केरळमध्ये (Weather Update) मान्सून दाखल होण्याची अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3WHslxa

You might also like

Comments are closed.