Monsoon Update | टीम महाराष्ट्र देशा: अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biperjoy) सक्रिय झाल्यामुळे मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. मात्र, मान्सूनबाबत हवामान खात्याने एक आनंददायी बातमी दिली आहे. पुढील 48 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Cyclone in Arabian Sea will intensify
अरबी समुद्रातील चक्रीवादळ आणखीन तीव्र होणार असल्याची माहिती हवामान तज्ञ कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हे चक्रीवादळ आणखीन भयंकर रूप धारण करणार असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
7 June
🔸दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा कायम राहणे
🔸पश्चिमेकडील वाऱ्यांच्या उंचीमध्ये वाढ
🔸अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनार्यावरील ढगाळ वातावरणात वाढ.त्यामुळे पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल.
IMD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 7, 2023
The cyclone is likely to move northward in the next 24 hours
येत्या 24 तासांमध्ये हे चक्रीवादळ उत्तरेकडे जाण्याची शक्यता असल्याचं देखील कृष्णकांत होसळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या 48 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
7 Jun: Latest SCS Biparjoy over EC Arabian sea and around at 12.25 noon.
Likely to get intensified to Very Severe CS as per the IMD forecast.
We also see favourable cloudiness over parts of Kerala. pic.twitter.com/EOXiVQm1FU— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 7, 2023
दरम्यान, अरबी समुद्रामध्ये ‘बिपरजॉय’ नावाचे चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याने वादळाला ऊर्जा मिळत असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. पुढील 24 तासात या चक्रीवादळाची तीव्रता आणखीन वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Kolhapur Protest | तीव्र आंदोलनामुळं कोल्हापुरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद
- WTC Final | WTC फायनलचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? जाणून घ्या
- Nilesh Rane | कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंचा पवारांवर घणाघात
- Instagram Story | युजर्स संतापले! तुमच्या पण इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘हा’ बदल दिसतोय का?
- WTC Final | क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा एका सामन्यासाठी 2 पिच, नक्की काय आहे प्रकरण?
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MUFcaD