‘नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात’

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहेे. चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांनी केेलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिलं होतं, त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका करत ‘दादा आणि दादा’ यांच्यातील शाब्दिक वादात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे.

दिल्लीतील चौकीदारचं लक्ष देशाच्या तिजोरीवर आणि गल्लीतल्या ठेकेदारचं लक्ष सिल्वर ओकच्या ड्राव्हरवर आहे. करवीरच्या खजिन्यावर असाच डोळा असेल म्हणुन करवीरकरांनी हाकललं होतं. त्यामुळं नंतर कोथरूड शोधावं लागलं, अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्याचबरोबर नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं ‘चंपा’ म्हणतात, असा टोला देखील त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

‘शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक आहे,’ असा सवाल करत अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच जुनं झालं तरी खोट आहे ते खोटंच, असा टोलाही त्यांनी लगावला. आता चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.

‘दिल्लीतील चौकीदारचं लक्ष देशाच्या तिजोरीवर आणि गल्लीतल्या ठेकेदारचं लक्ष सिल्वर ओक च्या ड्राव्हरवर. करवीरच्या खजिन्यावर असाच डोळा असेल म्हणुन करवीरकरांनी हाकललं, नंतर कोथरूड शोधावं लागलं. नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात,’ अशी जहरी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा