InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘त्या’ घटनेनंतर पाकिस्तानकडून सीमेवर 300 रणगाडे तैनात

भारतीय हवाई दलाने चढवलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याला दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र, पाकिस्तान आजही सावध असून एकीकडे तणाव कमी करण्याचे सोंग रचत महत्वाचा भाग असलेल्या शकरगडमध्ये तब्बल 300 रणगाडे तैनात केलेले आहेत.

पुलवमामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. यानंतर भारत पलटवार करणार या भीतीने पाकिस्तानने सीमेवर विशेष सैन्य तैनात केले होते. नुकतेच तणाव कमी करण्यासाठी हे दल मागे घेतले असले तरीही पाकिस्तानने सीमेवर अद्याप तीन ब्रिगेड ठेवलेली आहेत. यामध्ये बख्तरबंद ब्रिगेड, 125 बख्तरबंद ब्रिगेड आणि 8-15 डिव्हिजन तैनात केलेल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply