InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

More

कोंबडा आरवल्याने झोपमोड होते, पुण्यातील महिलेने केली पोलिसांकडे तक्रार

कोंबडा आरवल्याने झोपमोड झाल्याची तक्रार पोलिसांकडे पुण्यातील एका महिलेने केली आहे, पुण्यातील समर्थनगर पोलीस ठाण्यात एक निनावी तक्रार अर्ज आला आहे.या तक्रार अर्जात महिलेने म्हटले आहे की, घराजवळ पहाटे साडे चार वाजता कोंबडा आरवतो आणि त्यामुळे झोप मोड होते. यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, असे महिलेने म्हटले आहे. महिलेचा हा तक्रार अर्ज वाचून पोलीसही चक्रावून गेले होते.या अनोख्या तक्रारीची सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे.महत्त्वाच्या बातम्या –संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच…
Read More...

गुजरातच्या सूरत येथे इमारतीमध्ये लागलेल्या आगीत 21 मुलांचा मृत्यू

गुजरातमधील सुरत येथे एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये 21 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.  20 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर एका विद्यार्थ्याचा इमारतीमधून उडी मारल्याने अंत झाला. दुर्घटनेत जखमी झालेल्या 11 विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे.तक्षशिला कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये अनेक दुकानं आणि कोचिंग सेंटर आहेत. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कोचिंग क्लास सुरू असतानाचा आग लागली.आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक…
Read More...

नांदेड लोकसभा मतदारसंघामधून अशोक चव्हाण यांचा पराभव

नांदेड लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आहे. भाजपचे प्रताप पाटील 30 ते 35 हजारांनी जिंकले आहेत. वंचित आघाडीचा फटका अशोक चव्हाण यांना बसला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या भारतातील लोकशाहीचा आज सर्वात मोठा उत्सव आहे. 17व्या लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या मैदानात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपली प्रतिष्ठा…
Read More...

‘त्याने’ तब्बल 24 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा केला विश्वविक्रम

नेपाळमधील कामी रिता शेर्पा या वाटसरूने तब्बल 24 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विश्वविक्रम केला आहे. मागील आठवड्यातच 23 व्यांदा शिखर सर केले होते, काल पुन्हा एकदा शिखर सर करत विक्रम केला आहे.मागील दोन दशकांहून अधिक काळापासून एव्हरेस्टवर जाणाऱ्या गिर्यारोहकांना वाट दाखवण्याचे काम करणाऱ्या रिता यांनी सर्वात आधी १९९४ साली एव्हरेस्टचे ८ हजार ८४८ मीटर उंचीचे शिखर सर केले होते. त्यानंतर मागील २५ वर्षांमध्ये रिता यांनी ३५ हून अधिक वेळा ८ हजार मीटरहून अधिक उंचीची शिखरे सर केली आहेत. ४९ वर्षाच्या…
Read More...

एक्झिट पोलनंतर शेअर बाजारात जबरदस्त उसळी

लोकसभा निवडणुकीचा काल अंतिम टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. एक्झिट पोलच्या या अंदाजाने सोमवारी सकाळी शेअर बाजारात मोठी उसळी पहायला मिळाली.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला. तर निफ्टी देखील 11 हजार 648 अंकांवर पोहोचला.23 मे रोजी लोकसभेचे निकाल जाहीर होणार असून, पोल्सला शेअर बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे निकालानंतर शेअर बाजार आणखी उसळी मारण्याची शक्यता वर्तवण्यात…
Read More...

7 अब्ज 3 कोटी 48 लाखांची मालक असलेल्या जगातील सर्वात श्रीमंत मांजरीचे निधन

तब्बल 7 अब्ज, 3 कोटी, 48 लाख रुपयांची मालक असलेल्या जगातील सर्वात श्रींमत ग्रुम्पी कॅट नावाच्या मांजरीचे काल निधन झालेले आहे. ग्रुम्पी कॅट तिच्या रागट लुकसाठी इंटरनेटवर प्रसिद्ध होती. वयाच्या 7 व्या वर्षी तिचे निधन झाले आहे. तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.https://twitter.com/RealGrumpyCat/status/1129310647458467840Grumpy Cat चे खरे नाव Tardar Sauce असे होते. मृत्राचा संसर्ग झाल्याने ग्रुम्पीचा मृत्यू झाला. मॉरिसटाऊनचे प्रसिद्ध उद्योजक तबाथा यांची ही कॅट…
Read More...

सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षणाचे नाशिक येथे आयोजन

मुंबई, दि. 11 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी उमेदवारांनाService Selection Board (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दि. 21 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत एसएसबी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी…
Read More...

आदिवासी बांधवांच्या वनहक्क सातबारा संदर्भात विशेष मोहीम राबविण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मुंबई, दि. 11 : आदिवासी बांधवांना वनहक्काचे सातबारा देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरु करुन हे काम एका महिन्यात पूर्ण करा. त्याचप्रमाणे एका एकर पेक्षा कमी जमीन त्यांना देऊ नका, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित विभागांना दिल्या.आदिवासी विकास विभागाच्यावतीने सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जनजाती सल्लागार परिषदेच्या 50 व्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास…
Read More...

शेतकऱ्यांना अटक करणारे फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे दौऱ्यावर असताना  दौऱ्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला ताब्यात घेतले होते. यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे.धनंजय मुंडेंनी म्हंटले कि, मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणा-या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे तर फडणवीस सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा…
Read More...