InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भारतीय संघातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटर…

राजस्थानची राहणारी २२ वर्षीय प्रिया पुनिया भारतीय संघात सहभागी झाली आहे. प्रिया पुनियाला सर्वात सुंदर महिला क्रिकेटरचा किताब मिळाला होता. प्रिया पुनियाने भारतीय क्रिकेट टीममध्ये सहभागी होण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. गेल्या अनेक दिवसापासूनच्या संघर्षानंतर तिला संधी मिळाली आहे.

प्रिया पुनियाचा संघर्षः

प्रियाचे वडील सुरेंद्र पुनिया यांनी स्वप्न पाहिलं होतं की, प्रिया एक विश्व प्रसिद्ध खेळाडू बनावी. त्यासाठी त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. प्रिया सुरुवातीला फुटबॉलमध्ये करिअर बनवू इच्छित होती. त्यासाठी तिच्या वडिलांनी एक भूखंड देखील विकत घेतला होता. ज्यासाठी त्यांना त्यांची संपूर्ण संपत्ती विकावी लागली होती.

जेव्हा प्रियाची आवड क्रिकेटमध्ये निर्माण होऊ लागली तेव्हा तिच्या वडिलांनी एक चांगली पिच तयार केली. सोबतच सरावासाठी एक नेट देखील तयारी केली. प्रिया २०१५ मध्ये चर्चेत आली होती. जेव्हा तिने उत्तरच्या टीमचं प्रतिनिधित्व केलं होतं.

प्रियाने टीम इंडियामध्ये निवड झाल्याचं श्रेय आपल्या वडिलांना दिलं आहे. प्रिया म्हणते की, ती आज जे पण तिच्या वडिलांमुळे. जयपूरच्या प्रिया पुनियाने डोमेस्टीक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर २०१५ पासून नॅशनल टीममध्ये स्थान मिळेल अशी आशा करत होती.

सचिनची प्रतिक्रिया

प्रिया पुनियाचा क्रिकेटर बनण्याचा प्रवास आणि तिच्या वडिलांची मेहनत याबाबत भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरने देखील ट्विट केलं आहे. सचिनने म्हटलं की, ‘मेहनत आणि खरा पाठिंबा असला की यशाचा मार्ग कसा तयार होतो हे यावरुन दिसतं.’

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply