Moto’s New Mobile Launch | Motorola चा Moto E22s मोबाईल भारतात लाँच

टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सगळीकडे फेस्टिव्ह सीजनचे वातावरण आहे. त्यामुळे सगळीकडे वस्तूचे खरेदी विक्रीचा जोर वाढलेला असून प्रत्येक कंपनी आपले नवनवीन प्रॉडक्ट्स बाजारामध्ये लाँच करत आहे. अशा परिस्थितीत मोटोने (Moto) आपला नवीन Moto E22 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G37 प्रोसिजर सज्ज असून यामध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी उपलब्ध आहे.

Moto E 22 फिचर्स

मोटोच्या नव्याने लाँच झालेल्या या स्मार्टफोनमध्ये 90Hz चा स्क्रीन रिफ्रेश रेट, 1600 x 720 पिक्सेल्सचे रिझोल्यूशन, 500 nits पीक ब्राइटनेस, IP52 डस्ट आणि वॉटर-रेझिस्टंट कोटिंग आणि Widevine L1 सर्टिफिकेशनसह 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. त्याचबरोबर हा मोबाईल MediaTek Helio G37 सिस्टीम-ऑन-चीप द्वारे सुसज्ज आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी उपलब्ध आहे.

Moto E 22 कॅमेरा

या फोनच्या कॅमेरा बद्दल जर बोलायचं झाले तर यामध्ये, 16MP प्रायमरी सेंसर आणि 2MP डेट सेन्सर असलेला ड्युअल रियल कॅमेरा सेटअप आहे. यास मोबाईल मध्ये सेल्फी साठी 8MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी साठी या स्मार्टफोनमध्ये 4G कनेक्टिव्हिटी, ड्युअल-बँड वायफाय, वाय-फाय हॉटस्पॉट, GPS, ब्लूटूथ 5.0 आणि 3.5 मिमी जॅक आहे.

Moto E22 किंमत

भारतीय बाजारामध्ये Moto E22 चे 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 8,999 रुपये आहे. मोटोचा हा नवीन स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअर्स मध्ये 22 ऑक्टोबर दुपारी 12 वाजल्यानंतर इको ब्लॅक आणि आर्टिक ब्लू कलर मध्ये उपलब्ध होईल.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.