Mouni Roy | ‘मौनी रॉय’च्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मौनी कधी तिच्या फिल्मी करिअरमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पण या सगळ्या धावपळीमध्ये ती तिच्या स्टाईलकडे कधी दुर्लक्ष करत नाही. मौनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या चाहत्यांसाठी दररोज काही ना काही शेअर करत असते. चाहते तिच्या या पोस्टबरोबरच तिच्या धमकेदार अभिनयाकडे दिवसेंदिवस आकर्षित होत चालले आहे. अशा परिस्थितीत मौनीने केलेले लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याला चांगली पसंती मिळत आहे.

मौनी रॉय (Mouni Roy) चा इंटेन्स फोटोशूट

बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत जोडलेली असते. तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या नव्या लूकची आणि वैयक्तिक आयुष्याची चाहत्यांना झलक पाहायला मिळते. नुकतच मौनीने तिचा नवीन लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिने टँक टॉप आणि डेनिम जीन्स घातलेली दिसत आहे. त्याचबरोबर तिचे मोकळे केस या लुकला परिपूर्ण करीत आहे. मौनी या लुक मध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

‘मौनी’चे फोटोशूट झाले व्हायरल

मौनीचे हे फोटोशूट काही मिनिटातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. वापरकर्त्यांनी मौनीच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर, मौनीने या फोटोशूट दरम्यान कॅमेरासमोर एकाहून एक पोज दिली असून, तिने तिचा लुक फ्लाँट केला आहे. या फोटोशूट मध्ये मौनी जमिनीवर बसून आणि पडून फोटो क्लिक करताना दिसत आहे. दरम्यान, मौनीची कर्व्ही बॉडी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय अलीकडेच रणवीर कपूर आणि आलिया भट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिकेत दिसली होती. ब्रह्मास्त्र चित्रपटातील मौनीच्या या भूमिकेला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर, मौनी परत तिच्या आगामी चित्रपट ‘द वार्निंग ट्री’ मुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण अद्याप या चित्रपटाबद्दल कुठलीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

महत्वाची बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.